पोलीस पाटील घोडसगाव श्रीराम खोटे यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.

0

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोडसगाव जवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घोडसगाव येथील शर्मा यांच्या हॉटेल जवळ 6 वर्षाची मुलगी व एक 45 वर्षाच्या संशयित इसम आढळून आल्याने पोलीस पाटील घोडसगाव श्रीराम खोटे यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळंके यांना फोन द्वारे कळविले पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळंके यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या ताफ्यासह घोडसगाव येथे पोहोचून संशयित इसम व सहा वर्षाची मुलगी यांना ताब्यात घेऊन मुक्ताईनगर पोलीस स्टेशन आणुन सदर मुलगी कोठून आले व काय प्रकार आहे बाबत सखोल चौकशी केली असता सदर बाबत पोलीस स्टेशन जळगाव (जामोद) जिल्हा बुलढाणा येथे अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असल्याचे समजले संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून पीएसआय निलेश सोळंके यांनी सदर पीडित मुलीस व संशयित इसम नामे संजय दामोदर मांडोकार रा वाघोळा ता मलकापूर जि बुलडाणा यास जळगाव जामोद पोस्टे चे अधिकारी यांच्या ताब्यात दिले असून पोउपनि निलेश सोळंके यांनी पोलीस पाटील घोडसगाव श्रीराम खोटे , ऍड विनोद इगळे, आकाश थाटे, अजय शर्मा, आदी. चे अभिनंदन करून आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.