मुक्ताईनगर (प्रतिनीधी) :- देशात कोरोना बाधितांची संख्या कमी होणाऱ्यांचं प्रमाण काही केल्याने कमी होताना दिसत नाही. शहरी व ग्रामीण भागात कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक उपाय योजना राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कोथळी येथे 14 वित्त आयोगातुन गावात मास्क वाटप करावे ही मागणी कोथळीचे पोलिस पाटील संजय चौधरी यांनी करताच ग्राम पंचायत तरुण तडफदार उपसरपंच उमेश राणे यांच्या सहीत सर्व ग्रा.पं.सदस्य यांनी मान्यता देवुन पुर्ण गावात मास्क वाटप केले. तसेच विना मास्क आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहीती घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका – वैशाली कोळी, किर्ती राणे, अंगणवाडी मदतनिस – वंदना चौधरी, वर्षा राणे, आशा सेविका – वर्षा पाटील, भारती सांगाळकर मास्क वाटप करतांना दिली. तसेच कोथळी परिसरात कोरोना संसर्गजन्य रोग पसरु नये म्हणून थर्मामिटर आरोग्य तपासणीसाठी दोन ते तिन दिवसात उपलब्ध होईल असे ग्रामपंचायत ग्रामसेवक मनोहर रोकडे यांनी सांगितले.
तसेच संसर्गजन्य जनजागृती कोरोना समितीचे सदस्य यांचे कार्य बघुन गांवकरी सहकार्य करीत असुन कोरोना गावात येऊच नये यासाठी प्रयत्न करीत आहे. ग्राम पंचायत कर्मचारी व पाणी पुरवठा पाणी तपासणी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका श्रीमती चव्हाण, सामुदाय वैद्यकीय अधिकारी विश्वकर्मा गावात सतत तपासणी करीत आहेत.