Saturday, October 1, 2022

पोलीस असल्याचे सांगून सोफेविक्रेत्याची दुचाकी लांबविली

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. चक्क पोलिस असल्याचे सांगून महामार्गावर सोफे विक्री करणाऱ्या एका गरीब सोफेविक्रेत्याची दुचाकी घेऊन एका भामट्याने पळ काढल्याची घटना रविवार दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी समोर  आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शेख असिफ शेख मुनाफ (वय ३२, रा. ख्वाजा नगर, पिंप्राळा हुडको) यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. शेख हे राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल चौकाच्या पुढे सोफे विकण्याचे काम करतात. रविवारी दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता एक अज्ञात इसम तेथे आला. त्याने पोलीस कटिंग केलेली होती. पायात पोलिसांच्या बुटासारखे बूट होते. शेख असिफ यास भामट्याने त्याच्याकडील ओळखपत्र दाखविले. ओळखपत्रावर पोलिस दलाचा सिम्बॉल होता. त्यामुळे नाव आसिफ व्यवस्थित पाहू शकला नाही.

त्या भामट्याने आसिफ याला सांगितले की, मी नगर येथील पोलीस आहे. ८ वर्ष मुलीवर बलात्कार झाला असून मी त्याचा तपास करीत आहे. मला येथे थोडा वेळ बसू दे म्हणून तो १२ ते ३ झोपला. त्यानंतर ३ वाजता उठून चहा पाणी घेतल्यानंतर त्याने जवळपास फेऱ्या मारल्या. संध्याकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला जायचे आहे सांगून आसिफ यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ ए वाय ८२३२ मागितली.

आसिफने त्यास दुचाकी दिली. मात्र बराच वेळ झाला, तो अज्ञात इसम दुचाकी घेऊन आलाच नाही. त्यामुळे आसिफने त्याच्या मित्रांच्या मदतीने गावात दुचाकी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुचाकी काही मिळाली नाही. त्यानंतर त्याने त्या भामट्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या