पोलीस असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी वृद्धे कडील सोन्याचा ऐवज हातचलाखी करून पळवला ,

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : आम्ही पोलीस असून शहरात दररोज चोऱ्या होत आहेत त्यामुळे तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा अशी बतावणी करीत दोघा भामट्यांनी हातचलाखी करून ८० वर्षीय वृद्धेच्या हातातील ६० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना भडगाव रस्त्यावर घडली.

याप्रकरणी  दोघं अनोळखी भामट्यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या घटनेची माहिती अशी की इंदुबाई धोंडू शिरोडे‌ वय ८० वर्ष  राहणार बस स्टॅन्ड मागे ,लक्ष्मी नगर, या सोमवारी दिनांक ७ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भडगाव रोड वरील भारत पेट्रोलियम जवळ श्रीपत नगर मध्ये नातेवाईकांकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असताना ४० ते ४५ वर्षे वयाचे दोन अनोळखी इसम इंदूबाई जवळ आले, आम्ही पोलीस असून शहरात रोज चोरीच्या घटना होत आहे तुम्ही तुमच्या दोन्ही हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा असे सांगितले इंदुबाई शिरोडे यांनी हातातील बांगड्या काढता येत नसल्याने दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील बांगड्या काढल्या व एका कागदात गुंडाळून ठेवण्यास सांगितले ,त्याप्रमाणे बांगड्या कागदात गुंडाळून ठेवल्या, त्यानंतर हे दोघं दुचाकीवरून बस स्थानकाच्या दिशेने निघून गेले .थोड्यावेळाने इंदुबाई शिरुडे यांच्या लक्षात आले की 30 ग्रॅम वजनाच्या रुपये ६० हजार किमतीच्या दोन पाटल्या( बांगड्या) या भामट्यांनी त्यांची दिशाभूल व हातचलाखीने फसवणूक करून पळून गेले. इंदुबाई  यानंतर घरी गेल्यावर आपल्या मुलाचा आपबिती सांगितली यादरम्यान इंदुबाई शिरोडे यांची झालेल्या घटनेमुळे तब्येत बिघडल्याने औषधोपचार घेऊन मंगळवारी त्यांनी शहर पोलिसात धाव घेऊन घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.

या प्रकरणी इंदुबाई शिरोडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दोन अज्ञात भामट्या च्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघा भामट्याचे वर्णन असे की अंदाजे वय ४० ते ५०वर्षे असून रंगाने गोरा शरीराने मजबूत मराठी भाषा बोलणारा चेहरा लांबट अंगात पांढऱ्या रंगाचे फूल बाईचा शर्ट फुल काळसर रंगाची पॅंट तर दुसरा भिमटा वय अंदाजे ४० ते ४५ रंगाने सावळा शरीराने मजबूत चेहरा गोल मराठी भाषा बोलणारा अंगात फुल बायांचा चेक शर्ट व काळसर रंगाची फुल पेंड, असे वर्णन अज्ञात दोघं भामट्यांच सांगितले  आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.