जळगाव पोलीस अधीक्षकपदी पी.व्ही.उगले यांची नियुक्ती

0

दत्तात्रय शिंदे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सुरक्षा अधीक्षकपदी बदली

जळगाव – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्यातील पोलीस अधिक्षकांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगावचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पी.व्ही.उगले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश रविवारी रात्री उशिरा पारित करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या बदलीची चर्चा रंगली होती. रविवारी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी राज्यातील १० पोलीस अधीक्षक वर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश पारित केले. जळगावचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सुरक्षा व अंमलबजावणीच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पी.व्ही.उगले यांची नेमणूक करण्यात आली आहे.चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी बदली झाली आहे. बच्छाव यांच्या जागी धुळे राज्य राखीव बलाचे समादेशक सचिन गोरे यांची नियुक्ती झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.