Friday, September 30, 2022

पोलीस अधिक्षक कार्यालयात गोंधळ; दोघांवर कारवाई

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव येथील जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

जितेंद्र अरुण चांगरे (वय ४५, रा. सिंधी कॉलनी) व निखिल राजू सोनवणे (वय २२, रा. कुसुंबा) हे दोघे सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी आरडाओरड करून गोंधळ घातला. सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी जिल्हापेठ पोलिसांना बोलावले.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी मद्यपान केल्याचे तपासणीत आढळून आले. दोघांविरुद्ध आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी अटक नोंद घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यातील जितेंद्र अरूण चांगरे हे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी असून त्यांच्यासह निखील सोनवणेच्या विरोधात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या