पारोळा (प्रतिनिधी) : राज्यात दोन वर्षापासून पोलीस भर्ती झालेली नाही, म्हणून २०१८ मधील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी पारोळा एरंडोल चे आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान मागील दोन वर्षा पासुन राज्यात पोलीस भर्ती झालेली नाही. तसेच जगभराप्रमाणेच महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस प्रशासन चांगली कामगिरी बजावत असुन त्यांना मनुष्य बळाची अवश्यकता असल्याने सन २०१८ मधील पोलीस भरती प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना ची निवड प्रक्रिया पूर्ण करून कामावर रूजू करून घेण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेश निर्गमित करावेत अशी मागणी पारोळा एरंडोल चे आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे, आमदार चिमणराव पाटील यांनी या मागणी च्या प्रती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील, गृहराज्यमंत्री ग्रामीण शंभुराज देसाई यांचा कडे पाठविल्या आहेत.