पोलिस पाटील प्रशासनाचा महत्वाचा कणा – डीवायएसपी सुरेश जाधव

0

बोदवड – पोलिस पाटील हे पद अत्यंत महत्त्वाचे असून गावचा पोलीस पाटील हा पोलिस प्रशासनाचा शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा कणा आहे.असे प्रतिपादन मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश जाधव यांनी येथील गुप्ता कॉम्प्लेक्स मधील बैठक हॉलमध्ये आयोजित ५२ व्या पोलिस पाटील वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर बोदवड तहसिलदार रविंद्र जोगी,पोलिस निरीक्षक सुनील खरे जेष्ठ पत्रकार महेंद्र पाटील,पोलिस पाटील संघटनेचे खानदेश विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, महिला कार्याध्यक्ष सौ.वर्षाताई पाटील,महिला उपाध्यक्ष सौ.लिलाताई पाटील,जिल्हा सरचिटणीस गोपाळराव पाटील,बोदवड तालुका पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप सुकाळे, मुक्ताईनगरचे मोहन मेढे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात तहसिलदार रविंद्र जोगी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.आपल्या अध्यक्षनीय भाषणात पोलिस पाटील पद अत्यंत महत्त्वाचे असून गावचा पोलीस पाटील हा पोलिस प्रशासनाचा कणा आहे.असे प्रतिपादन यावेळी डीवायएसपी श्री.जाधव यांनी केले.तर आपल्या मनोगतात जेष्ठ पत्रकार महेंद्र पाटील यांनी पोलिस पाटील यांना प्रशासनाने योग्य ते सहकार्य केल्यास ते आपलं काम अधिक प्रभावीपणे करतील असे मत व्यक्त केले.

गावातील प्रत्येक पोलिस पाटील यांना ओळखपत्र असणं आवश्यक असून याची प्रशासनाने अंलबजावणी करणं गरजेचं आहे असं मतं तहसिलदार रविंद्र जोगी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष जगताप तर आभार नितीन गोरे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील पोलिस पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.