Thursday, September 29, 2022

पोलिस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांना झालेल्या मारहाणीचा निषेध

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

लोणी ता. जामनेर येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व ठाणे अंमलदार यांचेवर  येथील दत्तु कडु उगले, ज्ञानेश्वर कडु उगले, भास्कर काशिनाथ वाघ, महादु कडु उगले, पवन महादु उगले, किर्तीराज केशव उगले, सागर केशव उगले राहणार सर्व लोणी ता. जामनेर यांनी हल्ला चढवुन पोलिस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांना मारहाण व शिवीगाळ केली.

- Advertisement -

- Advertisement -

या घटनेच्या निषेधार्थ व संबंधित सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून पोलिस बाॅईज असोसिएशनतर्फे आज दि. २३ रोजी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पोलिस  बाॅईज असोसिएशनचे जिल्हा सचिव हर्षल पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख, उपाध्यक्ष प्रफुल पाटील, जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटील, हितेंद्र पाटील सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे (जळगाव), पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे (पाचोरा), आमदार किशोर पाटील यांना पाठविण्यात आल्या आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या