पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघं बचावले

0

जामनेर –
भवानी घाटात बोलेरो गाडीला झालेल्या अपघातात दोन इसम जखमी झाल्याची खबर मिळताच पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने त्या इसमांचे प्राण वाचल्याची घटना 17 रोजी घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार 17 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास जामनेर-बोदवड मार्गावरील भवानी घाटात एम.एच.46/ए.एफ. 0745 क्रमांकाच्या बोेलेरो गाडीला अपघात होवून दोन इसम जखमी झाल्याची खबर जामनेर पो.स्टे.चे रात्रगस्त घालणार्‍या पोलिस पोहेकाँ सुभाष माळी, पो.ना. शिवाजी पाटील, पो.ना. सुनिल राठोड, पोलिस गाडीवरचे चालक इस्माईल शेख यांना मिळाल्याने त्यांनी त्याची त्वरीत दखल घेवून घटनास्थळी जात अपघातात जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या बोलेरोचे चालक शेख रहीम रा. मुक्ताईनगर, क्लिनर शेख अलताफ यांना 108 अ‍ॅम्बुलंस गाडीने उपजिल्हा रूग्णालय जामनेर येथे उपचारार्थ दाखल केले व जखमी रुग्णांच्या नातेवाईकांना घटनेचे वृत्त कळविले.जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून जखमींची प्रकृती स्थिर आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे यांनी दूरध्वनीव्दारे 108 अ‍ॅम्बुलन्सला कळवून घटनास्थळी पाचारण केले. जखमींच्या नातेवाईकांनी पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याबद्द्ल कृतज्ञता व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.