Tuesday, September 27, 2022

पैसे आणि सोन्याच्या चैनसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील विवाहितेला माहेरहून सोन्याची चैन आणि पाच लाख रूपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

- Advertisement -

शबनमबी शेख वसीम (वय २२, रा. मारूती नगर लिंबायत ह.मु. नशिराबाद) यांचा विवाह सुरत येथील शेख वसीम शेख सत्तार यांच्याशी सन २०१७ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर पती शेख वसीम याने विवाहितेला माहेरहून सोन्याची चैन आणि प्लॅट घेण्यासाठी पाच लाख रूपये आणावे अशी मागणी केली. परंतू विवाहितेच्या आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पैश्यांची पुर्तता करू शकल्या नाही. याचा राग येवून पती वसीम शेख याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तर सासू, सासरे, मावस सासरे आणि नणंद यांनी मारहाण करून घराबाहेर काढून दिले.

सदर प्रकार सहन न झाल्याने विवाहिता नशिराबाद येथे माहेरी निघून आल्या. शबनमबी यांनी १ नोव्हेंबर रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती वसीम शेख, सासू अकलीमाबी शेख सत्तार, सासरे शेख सत्तार शेख गफ्फार, नणंद मुन्नीबी शेख अकील आणि मावस सासरे फरीद लुना पहेलवान सर्व रा. लिंबायत सुरत यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या