Wednesday, August 17, 2022

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतिसह पाच जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

दहा लाख रुपये माहेरवरून आणण्याची विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात पतीसह सासरच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

चाळीसगाव शहरातील शिंदी कॉलनी भागातील सोनम विनय दुसाने (वय ३०) या विवाहितेचा लग्न नाशिक येथील विनय प्रकाश दुसाने यांच्याशी झाला. सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी तुझ्या आई-वडीलांकडून १० लाख रुपये घेऊन ये असे सांगून पती व सासरच्या सदस्यांकडून तिला शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला. या सगळ्या गोष्टींला कंटाळून सोनम ही  आपल्या आईवडिलांकडे येऊन राहायला लागली.

२५ जून २०१९ ते २६ सप्टेंबर २०२० या कालावधीत तिला अमानवी वागणूक दिली गेली. शेवटी या मानसिक त्रास सहन न झाल्याने सोनम हिने चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून पतीसह सासु- सासरे, दिर, मावस सासरे व मावस सासु यांच्या विरुद्ध भादवी कलम- ४९८(अ), ४०६, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस हवा किशोर सोनवणे हे करीत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या