Monday, January 30, 2023

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील  सुप्रिम कॉलनीतील विवाहितेचा माहेरहून दोन लाख रूपये आणावे, यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शमिना आसिफ खान (वय २०, रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी जळगाव ह.मु. सबजेलच्या पाठीमागे) यांचा  विवाह शहरातील आसिफ खान रेहेमतुल्ला खान यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. पती आशिफ खान व त्यांच्या कुटुंबियांनी सुरूवातीला विवाहितेला चांगली वागणूक दिली. त्यानंतर विवाहितेला माहेरहून दोन लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला.

- Advertisement -

दरम्यान आईवडीलांची परिस्थीत गरीबीची असल्यामुळे पैशांची  पुर्तता करू शकत नसल्याचे विवाहितेने सांगितले. याचा राग येवून पती आशिफ खान याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचप्रमाणे घरातील सासरे, जेठाणी, दिर यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात.

याप्रकरणी  सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती अशीफ खान, सासरे रेहेमतुल्ला खान, जेठाणी नमिरा मोहसिन खान, दिर बबलू रेहेमतुल्ला खान सर्व रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे