Wednesday, September 28, 2022

पैशांसाठी विवाहितेचा छळ; ८ जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सात जणांविरोधात चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

तालुक्यातील टाकळी येथे माहेर असलेल्या २९ वर्षीय विवाहितेचा विवाह तालुक्यातील रोहिणी येथील बाळासाहेब बळीराम नागरे यांच्याशी 2005 मध्ये झाला. लग्नाच्या एक वर्षापर्यंत सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती बाळासाहेब नागरे याने विवाहितेचे मामा बाजीराव सोनवणे यांच्याकडून १० हजार रुपये आणण्याची मागणी केली.

मागणी पूर्ण केल्याने पतीने शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर सासरे बळीराम नागरे, सासू जनाबाई नागरे, जेठ शांताराम नागरे, जेठाणी सविता नागरे, नणंद सरिता उर्फ शोभा डिघोळे यांनी पती बाळासाहेब नागरे यांचे कान भरून वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करण्यास सांगितले. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी टाकळी येथे निघून आल्या.

चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक शैलेंद्र पाटील करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या