पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती प्रबळ : ऍड उज्वल निकम

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही नेहमीच प्रबळ असते. लोक वर्गणीतून उभारलेले दातृत्व हे मनाच्या श्रीमंतीचे प्रतीक आहे, असे गौरवोद्गार जेष्ठ विधितज्ञ पद्मश्री अँड उज्वल निकम यांनी केले. शिवशाही फाऊंडेशन व साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच तर्फे उभारलेल्या रुग्णावश्यक वैद्यकीय साहित्यांच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते.

आमदार अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा पुष्पलताताई पाटील, माजी आमदार डॉ . बी . एस पाटील, माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिताताई वाघ, दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, जळगाव मनपाचे वित्त व लेखाधिकारी कपिल पवार, आयएएस गौरव साळुंखे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, शिवशाही फाउंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, डी.ए.धनगर, दत्तात्रय सोनवणे, मनोहर नेरकर, प्रेमराज पवार, चंद्रकांत पाटील, निरंजन पेंढारे, अशोक पाटील, मंगलाताई पाटील, छाया सोनवणे, विशाल देशमुख, भावेश सोनवणे व उमेश काटे आदी उपस्थित होते. नोबल फाउंडेशन चे अध्यक्ष प्रा जयदीप पाटील व युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

१८२ दानशूर व्यक्तीचे योगदान

कोरोना काळात आलेल्या आपात्कालीन परिस्थितीमुळे रुग्णांना वेळेवर साहित्य उपलब्ध होत नव्हते हीच बाब ओळखून शिवशाही फाऊंडेशन व साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच तर्फे सानेगुरुजी आरोग्यदायी स्वेच्छानिधी उभारण्यात आला. यात सुमारे १८२ शिक्षक व इतर दानशूर व्यक्तींनी आपले आर्थिक योगदान देऊन सुमारे १ लाख २५ हजाराचा निधी जमा केला होता. या उभारलेल्या रक्कमेतून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, वॉकर, कमोडचेअर, गुल्कोमीटर, फोल्डबल बेड, व्हील चेअर, ऑक्सिमिटर, थर्मामीटर, स्टिक, टॉयलेट पॉट, टेंपरेचर, बी.पी. डिजिटल मोजयंत्र , पाणी वाफ यंत्र, लहान मुलांसाठी वाफ यंत्र हे आवश्यक साहित्य खरेदी केले आहेत. ज्या गरजू रुग्णांना या साहित्याची गरज असेल त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन शिवशाही फाऊंडेशन व साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here