पैतृक संस्था समाज प्रेरणा व उपक्रमाचा आदर्श पुढच्या पिढीने घ्यावा

0

डॉ. अनिल राव, अविनाशी सेवा पुरस्कार -31 रोजी वितरण

जळगांव.दि. 21-
केशवस्मृती प्रतिष्ठान व जळगांव जनता सह. बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक, शैक्षणिक,आरोग्य आणि सेवा या माध्यमातुन पैतृक संस्था म्हणून कार्य करीत असून या सेवा समुहाचे अध्यक्ष डॉ. अविनाश आचार्य यांचे बहुमुल्य योगदान असून त्यांची स्मृती कायम रहावी व शहराला ओळख मिळून त्यांची पे्ररणा, उपक्रम शहरवासीयांसमोर यावेत याचा पुढील पिढीने आदर्श घ्यावा असे जळगांव जनता बॅक अध्यक्ष डॉ. अनिल राव यांनी बँकेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत अविनाशी पुरस्कार वितरण 31 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज नाटयगृहात सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी,उद्योजक पुखराज पगारीया यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती देतांना सांगीतले.
पुढे बोलतांना ते म्हणाले कि, जनता सहकारी बँकेच्या स्थापनेला 40 वर्षे पुर्ण होत असून ज्यांनी बँकेची स्थापना केली त्यांच्या स्मरणार्थ डॉ.आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार योजनेतंर्गत पुरस्कार गेल्या 5 वर्षापासून देण्यात येतात. हे सहावे वर्ष असून या वर्षी संस्थात्मक गटातुन साकार संस्था तर व्यक्तिगत गटातुन संतोष गर्जे यांना जाहिर झाले असून केशवस्मृती सेवा संस्था व जनता सह बॅक यांच्या तर्फे समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित, अनाथ, हरवलेल्या, घरातुन पळून आलेल्या मुलांचा सांभाळ करणार्‍यांचा सस्था व व्यक्तीच्या कार्याची दखल नियुक्त करण्यात आलेल्या समितीने घेतली व या समितीत बँक संचालक हरीष यादव,विेवेकानंद प्रतिष्ठानच्या हेमा अमळकर,कविता दिक्षीत,बळवंत पतसंस्थेचे संदिप लाड,संगीता अट्रावलकर,आरोग्य विभागाचे भानुदास येवलेकर यांचा समावेश होता.
केशवस्मृती प्रतिष्ठान व जनता सह.बँकेतर्फे दिल्या जाणार्‍या पुरस्काराचे स्वरूप संस्थेसाठी 1 लाख एक हजार तर व्यक्तिगत साठी 51 हजार रूपये ,मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. जन्मतः टाकून दिलेल्या अनाथ बालकांचे सगांपन संस्था व त्याना हक्काचे घर मिळवून देण्यासाइी साकार संस्था औरंगाबाद संस्था कार्यरत असून हे वस्तीगृह नसून या मुलांना हक्काचे घर मिळावे, यासाठी पालकांनाी मुल दत्तक घ्यावे हा संदेश देणारी संस्था आहे तर,बीड जिल्हयात उसतोड कामगाराच्या कुटुबांत जन्मलेले संतोष गर्जे यांनी बहिणीच्या मृत्युनंतर अनाथ झालेल्या मुलाचा सांभाळ 19 वर्षापासून करत आहेत तर उसतोडणीमुळे सतत स्थलांतरीत मुलांची आबाळ होउ नये म्हणून उशारीवर पत्रे घेउन तीन खोल्यांच्या शेडमधे अशा अनेक अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या अनाथालयात निराधार,निराश्रीत,उपेक्षित, देह व्यापारातुन शोषणातुन बळी पडलेल्या महिलांचे बालके, कैद्यांची बालके, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची मुले, आपले भवितव्य घडवित आहेत.यापूर्वी विजय जाधव ठाणे,स्नेहालय संस्था नगर, रामेश्वर नाईक जामनेर, उमेद परीवार पुणे, भारताबाई देवकर तुळजापूर, अहिल्याबाई महिला मंडळ रायगड, नरसिंह झरे अनसरवाडा लातुर, शबरी सेवा समिती रायगड, मीरा कुळकर्णी आसाम, दिनदयाळ बहु.प्रसारक मंडळ यवतमाळ आदींना पुरस्कार देण्यात आले होते. अशी माहिती दिली. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सचिव रत्नाकर पाटील, बँकेचे सीईओ पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.