पेस्ट कंट्रोल जीवावर बेतलं ; पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू

0

पुणे : घरामध्ये पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी (दि. 12) घडली. अविनाश मजली (वय 64) आणि अपर्णा मजली (वय 54) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बिबवेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश मजली व अपर्णा मजली यांनी बुधवारी सकाळी 9 वाजता घरामध्ये पेस्ट कंट्रोल केले. त्यानंतर ते घर बंद करून आपले मोठे भाऊ अशोक मजली यांच्याकडे गेले. दिवसभर त्यांच्याकडे थांबून ते दोघे घरी संध्याकाळी 7 वाजता घरी परत आले. परंतु, पेस्ट कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी घराचे दरवाजे, खिडक्या न उघडता, घरातील पंखा चालू न करता घरात टीव्ही पाहत बसले.

सव्वासात वाजण्याच्या सुमारास त्यांना चक्कर आल्यामुळे त्यांची मुलगी श्रावणी मजली यांनी त्या दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी दोघेही बेशुद्धावस्थेत होते. मात्र उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.