पेट्रोल-डीझेल महागले ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

0

नवी दिल्ली । मागील काही दिवसापासून सुरु असलेली इंधन दर वाढ सुरुच आहे. आज सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

शुक्रवारी पेट्रोलच्या दरात तब्बल 23 ते 25 पैशांची वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात 24 ते 27 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर 25 पैशांनी वाढले आहेत, मुंबईत 24 पैसे, कोलकात्यात 24 पैसे आणि चेन्नईत 22 पैशांनी वाढले आहेत

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, शुक्रावारी दिल्लीत पेट्रोलचा दर 85.45 रुपये प्रति लीटर इतका असेल. तर मुंबईत 92.04 रुपये प्रति लीटर असेल. तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 86.87 रुपये प्रति लीटर असेल. तर दिल्लीत डिझेलचा दर 75.63 रुपये प्रति लीटर असेल. तर मुंबईत 82.40 रुपये प्रति लीटरने डिझेल विकलं जाईल.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे दर

कोल्हापूर –

पेट्रोल : 92 रुपये प्रति लीटर

डिझेल : 81.10 रुपये प्रति लीटर

नागपूर –

पेट्रोल : 92.31 रुपये लीटर

डिझेल : 81.80 रु रुपये लीटर

पुणे –

पेट्रोल : 91.71 रुपये लीटर

डिझेल : 80.83 रुपये लीटर

औरंगाबाद –

पेट्रोल : 92.50 रुपये लीटर

डिझेल : 83.37 रुपये लीटर

नाशिक –

पेट्रोल : 92.24 रुपये लीटर

डिझेल : 81.07 रुपये लीटर

जळगाव –

पेट्रोल : 92.74 रुपये लीटर

डिझेल : 82.07 रुपये लीटर

रायगड – खोपोली –

पेट्रोल : 91.89 रुपये लीटर

डिझेल : 81.02 रुपये लीटर

नंदुरबार –

पेट्रोल : 92.39 रुपये लीटर

डिझेल : 81.65 रुपये लीटर

अडीच महिन्यांत डिझेलच्या दरात पाच रुपयांची वाढ झाली

थोड्या विरामानंतर गेल्या अडीच महिन्यांत डिझेलच्या दरात सुमारे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. आधीच भारी किंमतींमुळे त्रस्त ट्रान्सपोर्टर्स आता वाहतुकीच्या किंमतीत 10-15 टक्क्यांनी वाढ करणार आहेत. गेल्या 6 महिन्यांतील ही दुसरी वाढ असेल. वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार किंमती इतक्या वाढल्या आहेत की ग्राहकांवर भार टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

म्हणूनच पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात तेल उत्पादक देशांकडून कमी उत्पादन मिळाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. कमी उत्पादनामुळे तेलाची मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाले आहे. ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 35 ते 38 डॉलर होते, आता ते प्रति बॅरल 54 ते 55 डॉलर पर्यंत पोचले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.