पेट्रोल-डीझेलच्या दरात वाढ ; ‘हा’ आहे आजचा दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरु ठेवला आहे. आज पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी २५ पैसे वाढ झाली. दरवाढीने दिल्लीत पेट्रोल दर रेकॉर्ड स्तरावर गेला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर ८४.९५ रुपये झाला आहे. मुंबईत पेट्रोल ९१.५६ रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकावर आहे.

 

चालू महिन्यात १८ दिवसात पाचवेळा पेट्रोल दरात वाढ झाली आहे. ज्यात पेट्रोल १.२४ रुपयांनी महागले आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या सहामाहीत पेट्रोल दरात मोठी वाढ झाली होती. ज्यात पेट्रोल १५ रुपयांनी महागले आहे.

 

आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी २५ पैसे वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९१.५६ रुपये झाला आहे. एक लीटर डिझेलचा भाव ८१.८७ रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८४.९५ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.१३ रुपये आहे. चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८७.६३ रुपये असून डिझेल ८०.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८६.३९ रुपये असून डिझेल ७८.७२ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८७.८२ रुपये असून डिझेलचा भाव ७९.६७ रुपये आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ११ सेंट्सने घसरला असून तो ५२.२५ डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव १२ सेंटसने कमी होऊन ५६.६९ डॉलर झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.