नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलचे दर आज देशभरात विक्रमी उच्चांकावर आहेत. पेट्रोलने अनेक शहरांमध्ये प्रतिलिटर 100 रुपये ओलांडले आहेत. सध्या तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. तर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 29 पैसे आणि डिझेलच्या दरात 34 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 98.61 आणि डिझेल 90.11 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.
दररोज 6 वाजता किंमत बदलते
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
आपल्या शहरात पेट्रोल डिझेल कितीला विकले जात आहे ते पहा
>> दिल्लीत पेट्रोल 92.34 रुपये तर डिझेल प्रति लिटर 82.95 रुपये आहे.
>> मुंबईत पेट्रोल 98.61 रुपये तर डिझेल प्रति लिटर 90.11 रुपये आहे.
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 94.09 रुपये तर डिझेल 87.81 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 92.44 रुपये आणि डिझेल 85.79 रुपये प्रति लिटर आहे.