पेट्रोल-डिझेल महागणार ! केंद्र सरकारकडून सामान्यांच्या खिशाला कात्री
वाचा किती रुपयांनी वाढणार दर
नवी दिल्ली – आधीच महागाईच्या झळांनी हैराण झालेल्या सामान्य जनतेसाठी आणखी एक धक्का! केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे इंधन दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर जाणार आहे.
एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून, लोक आधीच आर्थिक अडचणीत आहेत. त्यात केंद्र सरकारने इंधन उत्पादन शुल्क वाढवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची टीका होत आहे.
सध्याची दरवाढ काय आहे?
सरकारच्या नव्या निर्णयानुसार: पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आता प्रति लिटर १३ रुपये डिझेलवरील उत्पादन शुल्क झाले १० रुपये प्रति लिटर दर आहेत .
गेल्या काही काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचे दर थोडेसे कमी झाले होते. मात्र, सरकारने त्या संधीचा फायदा जनतेला देण्याऐवजी कर वाढवून तोटा भरून काढण्याचा मार्ग अवलंबल्याचे दिसत आहे.