पेट्रोल-डिझेल दरात वाढ ; ‘हा’ आहे आजचा दर

0

मुंबई : आज सलग दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. कंपन्यांनी २९ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र कच्च्या तेलाचा भाव ५४ डाॅलरपर्यंत वाढल्यानंतर कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला. आज पेट्रोल २३ पैसे आणि डिझेल २६ पैशांनी महागले आहे.

दरवाढीनंतर आज मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९०.८३ रुपये झाला आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव ८१.०७ रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८४.२० रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७४.३८ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८६.९६ रुपये असून डिझेल ७९.७२ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.६८ रुपये असून डिझेल ७७.९७ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८७.०४ रुपये असून डिझेलचा भाव ७८.८७ रुपये आहे.

कंपन्यांनी यापूर्वी सलग २९ दिवस इंधन दर स्थिर ठेवले. याआधी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात तब्बल ४८ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून १५ वेळा इंधन दरवाढ झाली. ज्यात पेट्रोल २.५५ रुपयांनी महागले. तर याच कालावधी १२ वेळा डिझेल दरवाढ झाली. ज्यात डिझेलचा भाव ३.४१ रुपयांनी वधारला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.