Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, जाणून घ्या आजचे दर
    ताज्या बातम्या

    पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, जाणून घ्या आजचे दर

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 13, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी केले जातात. दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरानुसार आजही या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. अर्थात सलग 26व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नाही आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. मात्र यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. क्रूड ऑइलच्या किंमती कमी होऊन देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले नाहीत.  IOCL च्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लीटर आहेत.

    मे महिन्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर आता 25 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे  स्थिर आहेत. त्याआधी 42 दिवस झालेल्या इंधनवाढीबाबत बोलायचे झाले कर, पेट्रोल जवळपास 11.52 रुपये प्रति लीटरने महागले होते. तर डिझेल 9.08 रुपये प्रति लीटरने महागले होते.

    असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

    पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर

    दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

    पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

    • दिल्ली – पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर
    • मुंबई – पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.45 रुपये प्रति लीटर
    • चेन्नई – पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर
    • कोलकाता – पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर
    • भोपाळ – पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर
    • बंगळुरु – पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर
    • लखनऊ -पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर
    • पाटणा – पेट्रोल 104.25 रुपये आणि डिझेल 95.57 रुपये प्रति लीटर
    • जयपूर – पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर
    • गुरुग्राम – पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif