नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने घसरण होत असताना आता मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क(Excise Duty) करामध्ये ३ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत सातत्याने घसरण होत होती. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अधिकच कमी होण्याची शक्यता होती. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत घसरण झाल्याने कंपन्यांना होणारा तोटा भरुन काढण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या एक्साईज ड्युटीत 2 ते 8 रुपयांनी वाढ कऱण्यात आली असून डिझेलवरील एक्साईज ड्युटी 4 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.