नवी दिल्ली : देशामध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये गेल्या काही काळापासून दोन-तीन दिवसांच्या फरकाने काही पैशांमध्ये वाढ होत आहे. आज पेट्रोलच्या दरात 7 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 9 पैशांनी वाढ झाली.
या दरवाढीमुळे मुंबईतील पेट्रोलचा दर 78.59 प्रति लीटर आणि डिझेलचा दर 69.65 रुपयांवर पोहोचला आहे. निवडणुकीचा काळ असल्याने दर नियंत्रणात असले तरीही अमेरिकेने इराणकडून तेल खरेदीवर निर्बंध आणल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर होण्याची शक्यता आहे. मागील 10 दिवसांमध्ये डिझेलमध्ये 30 पैशांची वाढ नोंदविली गेली. तर पेट्रोलमध्ये 5-7 पैशांचा चढउतार पहायला मिळाला. 1 एप्रिलला पेट्रोलची किंमत 78.43 पैसे होती, तर डिझेलची किंमत 69.17 पैसे होती.