– ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेने विचारला जाब सत्यता काय?
पाचोरा (प्रतिनिधी) : सध्या सोशल मिडियावर एकच बातमी फिरते आहे पॅसेंजर झाली एक्सप्रेस म्हणून व त्यात भुसावळ – देवळाली तसेच भुसावळ – मुंबई पॅसेंजरचा ही समावेश असून काही स्टॉप रद्द होणार व प्रवाश्यांना दुप्पट भाडे मोजावे लागणार अशी बातमी माध्यमातून प्रसिद्ध झालेली आहे. याबाबत ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ प्रमुखांशी संपर्क साधून खान्देशातील प्रमुख अशा प्रकारच्या बातमी पेपर मध्ये अशी जनतेची दिशाभूल करणारी बातमी वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असे निदर्शनास आणून दिले. व गरीब, ग्रामीण प्रवासी मंडळावर असा अन्याय करून त्यांना प्रवासा पासून वंचित करू नये. असा कठोर निर्णय घेऊ नये याबाबत सविस्तर चर्चा केली. व असे झालेच तर या भुसावळ विभागात तात्काळ मेमु, डेमु ट्रेन सुरू करून सर्वच स्टॉप घेतले जावे असे सुचविले. यावर अधिकाऱ्यांनी खुलासा करत सध्या तरी अशी कुठलीही अधिकृत घोषणा रेल्वे मंडळाकडून करण्यात आलेली नाही. असे पाटील यांना कळविले. त्यावर पाटील यांनी संबंधितांना या चुकीच्या अनधिकृत वृत्तप्रसिद्धी बाबत रेल्वेतर्फे लेखी नोटीस बजावत जाब विचारावा असे सांगितले.
आपली सुचना तात्काळ नोंदवत शहानिशा करु व संबंधित वृत्तपत्रकांना तात्काळ नोटीस बजावली जाईल. असेही दिलीप पाटील यांना अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे. तूर्त अशी व्हायरल होत असलेली बातमी फेक आहे. त्यावर सध्या तरी विश्वास ठेवू नये असे आवाहन दिलीप पाटील यांकडून करण्यात आले आहे.