* नाजनीन शेख *
जळगाव ;-
जळगाव ;-
मासिकपाळीबाबत आजही मुलींमध्ये अनेक संभ्रम असल्याचे चित्र शहरी तसेच ग्रामीण भागात पाहायला मिळते . मात्र सॅनिटरी नॅपकिनचा वापर महिला व मुलींसाठी किती फायदेशीर ठरू शकतो आणि त्याच्या वापरामुळे अनेक आजारांना अटकाव करता येऊ शकतो याविषयीची संपूर्ण माहिती देणारा चित्रपट मपॅडमॅन म हा जिल्हा परिषदेतर्फे आज शुक्रवार 13 रोजी कांताबाई सभागृहात दाखविण्यात आला . यावेळी शहरातील सुमारे सातशे आठशे मुलींनी चित्रपट बघायला गर्दी केली होती . अनेक मुलींनी तर चित्रपट पाहून भारावून गेल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली तर काहींनी हा चित्रपट अनेक गैरसमज दूर करणारा असून याद्वारे मुलींमध्ये जागृती होईल असे मत मांडले … याबाबत विद्यार्थिनी व शिक्षिका यांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत ….
मासिक पाळीबाबत जनजागृती करणारा चित्रपट
मासिक पाळी आली की सर्वात अगोदर मी तणावात असते कि हे चार दिवस माझे कसे निघणार आणि त्या दिवसात जशी मला लाज वाटायची तशी या चित्रपटात हि बघायला मिळाला . यामध्ये पॅडमॅन बाबत एक पुरुष असून हि तो महिलांसाठी जीव लावून जनजागृती करतो आणि महिला असून हि त्याबाबती पासून लांब राहतात, हे एक नैसर्गिक क्रिया आहे अशी प्रतिक्रिया मुनेरा मुन्जा शेख अलिमुद्दीन ,इयत्या ८ वी, एम.ए.आर अँग्लो उर्दू हायस्कूल ,जळगाव हिने दिली .
चित्रपट बघून खूप प्रेरणा – धनश्री पाटील
जिल्हा परिषदे तर्फे या चित्रपट बघायला मिळाला , मला हा चित्रपट बघून खूप प्रेरणा मिळाली या चित्रपटामुळे मुली-महिलांमध्ये खरंच या बाबत जनजागृती होईल. अशी माहिती कन्या शाळेतील धनश्री हिने दिली
स्त्रियांच्या मनातील गैरसमज कमी होतील – प्राची पाटील
पॅडमन चित्रपटामुळे खेडेगावातील स्त्रियांच्या मनातील गैरसमज कमी होतील . या चित्रपटामध्ये खूप काही शिकायला मिळाला आहे . खरंच चांगली चित्रपट होती , अशी माहिती प. न. लुकडं कन्या शाळेंची प्राची पाटील हिने दिली.
मुलींना चित्रपटांमधून आरोग्यविषयक माहितीचे ज्ञान -आकांशा जोशी
या चित्रपटातून मुलींना आजारापासून सुटका मिळेल त्यांचा शरीर कसा प्रकारे निरोगी ठेवू शकतात यामध्ये दाखवला गेला आहे . अक्षय कुमार याने खूप चांगली भूमिका केली, या मध्ये जस शर्म ,शर्म ,शर्म याला मुली व महिला करत असतात तसंच रियल लाईफमध्ये हि आज हि करतात अशी माहिती प.न. लुंकड कन्या शाळा आकांशा राजेंद्र जोशी हिने दिली.
पॅडमन हा चित्रपट विद्यार्थिनीना प्रेरणा देणारा -वैशाली झोपे
पॅडमन हा चित्रपट विद्यार्थिनीना प्रेरणा देणारा, आत्मविश्वास देणारा आहे, समाजात स्त्रियांमध्ये ,विशेष करून ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील, या चित्रपटमधून एकट्या व्यक्तीने त्याचा विचार न करता संपूर्ण समाजाचा विचार केलेला आहे. सामाजाविषयी असलेले आपले ऋण व्यक्त करून आपला आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे. अशी माहिती नंदिनी बाई विद्यालयाच्या शिक्षिका वैशाली झोपे यांनी सांगितले.
मासिकपाळीबाबत खुली चर्चा हवी – एस.एन.चौधरी
मासिक पाळी बाबत महिलांमध्येही खुली चर्चा करायला हवी . आधी हि बाब लाजिरवान्यासारखा वाटायच्या . पण आता ह्या बाबत खुली चर्चा करायला तसं काही नाहीं वाटत , ग्रामीण भागात आज ही सार्वजनिक शौचालयाचा वापर महिला करतात. त्यामुळे त्यांच्यात आज ही जनजागृती त्या बाबत नाही .खरंच नक्की हे चित्रपट ग्रामीणच्या महिला मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल. अशी माहिती आर.आर. विद्यालयची शिक्षिका एस.एन.चौधरी यांनी दिली.
चित्रपटामुळे विद्यार्थिनींमध्ये जागृती – रागिनी पुराणिक
सॅनेटरी नॅपकिनच्या वापरामुळे रोग पसरत नाही . तो महिला व मुलींसाठी आरोग्यदायी आहे . विद्यार्थिनीमध्ये यामुळे जनजागृती झालेली आहे. प्रत्यक्ष हे चित्रपट पाहण्यामुळे खूप बदल घडेल अशी प्रतिक्रिया प. न.लुंकड कन्या शाळाची शिक्षिका रागिनी पुराणिक यांनी दिली .
चित्रपट पाहून अनेक शंकांचे निरसन – ललिता देशमुख
जी माहिती आम्हाला फारशी नव्हती ,परंतु चित्रपटामधून ती मिळाल्याने आमच्या सर्व शंका दूर झाल्या असे वाटते . सॅनेटरी नॅपकिन वापरण्याकरिता एक पुरुष असूनही महिलांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करतो हे खूप मनाला भावणारे होते अशी प्रतिक्रिया आर. आर . विद्यालयची ललिता देशमुख हिने दिली .