पूरग्रस्तांसाठी रिलायन्सकडून ५ कोटी, तर बिग बींकडून 51 लाखांची मदत

0

मुंबई: कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिवसेंदिवस मदतीचा ओघ वाढताना दिसत आहे. आता या मदतकार्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन धावून आलं आहे. रिलायन्स फाऊंडेशनने सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चेक स्वरुपात जमा केली. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे महानायक अमिताभ बच्चन यांनीही आश्वासन दिल्याप्रमाणे पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांचा धनादेश शासनाकडे सुपूर्द केला आहे. अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’च्या पत्रकारपरिषदेत पूरग्रस्तांसाठी मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली. तुमच्या मदतीमुळे इतरांनाही पूरग्रस्तांच्या पुनर्वसानासाठी मदत करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन  पूरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.