कळमसरे ता अमळनेर :- जम्मू काश्मिर येथील पुलवामा येथे दि 14 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ दशक्रिया विधि (मुंडन) व श्रद्धाजंली कार्यक्रम आज अमळनेर येथील अमळनेर-कळमसरे एकता अॅपे रिक्षा मित्र मंडळाकडून घेण्यात आला.
यावेळी सर्व रिक्षा चालकांनी आपले मुंडन करुन, दशक्रिया विधि करुन, श्रद्धाजंली वाहिली. यावेळी कळमसरे येथील प्रवीण चौधरी, जगदीश कुंभार, हेमंत चौधरी, कैलास बडगुजर, अमळनेर येथील दिलीप पाटील, अशोक आगलावे, सुभाष चौधरी, नितिन चौधरी, श्रावण चव्हाण, चंद्रकांत महाजन, आबा महाजन, राहुल कोळी, सुभाष देवरे, जगदीश पाटील, सतीश पाटील, दादाभाऊ कोळी आदि रिक्षा चालक उपस्थित होते.