जम्मू :- काश्मीरमधील पुलवामा लस्सीपुरा भागात पहाटेपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. चारही दहशतवादी हे लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून चौघांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
Jammu & Kashmir: 4 terrorists of Lashkar-e-Taiba (LeT) killed in an encounter with security forces in Lassipora area of Pulwama District. Identities yet to be ascertained. 2 AK rifles, 1 SLR & 1 pistol recovered. Search operation underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/hWerZnRXzr
— ANI (@ANI) 1 April 2019
पुलवामा येथील लस्सीपूरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सोमवारी पहाटेपासून परिसरात शोधमोहीम सुरु होती. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये लष्कर ए तोएबाच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मृत दहशतवाद्यांकडून 2 एके रायफल्स, 1 एसएलआर आणि 1 पिस्तुल जप्त करण्यात आली असून परिसरामध्ये लष्कराकडून शोधमोहीम सुरुच आहे. या चकमकीत सुरक्षा दलातील तीन जवानही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.