पुलवामात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत चार जवान शहीद

0

जम्मू- काश्मीर :- पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागातमध्ये आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारताचे चार जवान शहीद झाले आहे. यामध्ये मेजर पदावरील अधिकाऱ्याचा समावेश आहे.

पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी सोमवारी पहाटेपासून या भागामध्ये दहशतवाद्यांविरुद्ध शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेदरम्यान दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जवान यात जखमी झाला आहे. सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून अजूनही चकमक सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.