पुलवामा :– १७ व्या लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी आज देशातील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. यावेळी अनेक मतदान केंद्रावर धक्कादायक घटना घडत असून पुलवामा येथील मतदान केंद्राजवळ ‘ग्रेनेड हल्ला’करण्यात आला आहे. त्यामुळे येथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मात्र, ग्रेनेड हल्ल्यामध्ये कोणत्या प्रकारची हानी झाली का? याबद्दल अजून तरी कोणतीही माहिती समोर आली नाही.
दरम्यान याठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून लोकांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर लागल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे.