जम्मू काश्मीर :– जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. अद्यापही या परिसरात चकमक सुरुच असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
आज सकाळी त्राल परिसरात सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर गोळीबारी करण्यात आली. त्रालच्या जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. 42 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांकडून त्राल परिसरात विशेष ऑपरेशन हाती घेण्यात आलं आहे.
Jammu & Kashmir: An exchange of fire between terrorists and security forces is underway in forests of Tral area of Pulwama district. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/YmuXVT0arc
— ANI (@ANI) 26 June 2019