पुरवठा विभागाकडून रेशन दुकानाची तपासणी

0

जळगाव, दि.30 –
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी बुधवारी घेतलेल्या बैठकीनंतर गुरुवारी पुरवठा विभागाच्या पथकाने अचानक रेशन दुकानाची तपासणी केली. यावेळी दुकानाचे पिओएस मशीन आणि यादी तपासण्यात आली.
जिल्ह्यात रेशन दुकानावर धान्य वितरीत करण्यासाठी पीओएस मशीनचा उपयोग करण्यात यावा अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिल्या आहे. बुधवारी याबाबत बैठक घेवून सर्व रेशन दुकानदारांना सक्त ताकीद देण्यात आली. गुरुवारी दुपारी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी युवराज पवार, अवर कारकून अतुल जोशी, श्रीधर दांडगे, भागवत गायकवाड, सी.एस.खर्चे यांनी अचानक दिगंबर दामू मोरे यांच्या दुकानाची तपासणी केली. दुकानातील मशीन, केलेले वाटप, शिल्लक माल याची पथकाने तपासणी केली. दरम्यान, याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला असून काही तफावत आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे युवराज पवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.