पुन्हा दारू दुकाने बंद

0

कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेल्या भागातील किरकोळ मद्य विक्रीची दुकाने बंद राहणार

जळगाव | कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या शहरांमध्ये कोणाचा प्रादुर्भाव असलेले रुग्ण आढळले आहेत अशा शहरांमधले किरकोळ विक्री करणारी दारूची सर्व दुकाने आजपासून बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी आज रात्री उशिरा काढले यांनी काढलेला आदेश जसाचा तसा पुढील प्रमाणे महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांचे कार्यालय

आदेश | ज्या अर्थी, राज्य शासनाने कोरोना विधानाचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13.03.2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअर्थी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून एका ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी या कार्यालयाचे दिनांक 03.05.2020 चे आदेशान्वये जळगाव जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्त्या दिनांक 17 मे 2020 अखेर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

तदनंतर या कार्यालयाच्या दि. 04.05.2020 रोजीच्या आदेशानुसार विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याच्या अटीवर जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीमधील मॉल, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने तसेच कंटेनमेंट झोन मधील मद्य विक्री दुकाने वगळून जिल्ह्यातील इतर एफएल-2/ सीएलएफलटीओडी-3 अनुज्ञप्ती (वाईन शॉप), एफएलबीआर-2 (बीअर शॉपी), एफएलडब्ल्यू-2 (फक्त वाईनची विक्री करणारी दुकाने) व सीएल-3 अनुज्ञप्त्या (देशी दारु किरकोळ विक्री दुकाने) सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

क्षेत्रात ज्याअर्थी जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अद्यापही नागरिकांची सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी होताना दिसून येत नाही तसेच प्रतिबंधित देखील नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंग चे पालन होतांना दिसून येत नसल्यामुळे मी, डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव, मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक 10 मे 2020 पासून दिनांक 17 मे 2020 अखेरपर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे

1. जळगाव शहर महानगरपालिका, चोपडा नगरपालिका, अमळनेर नगरपालिका, भुसावळ नगरपालिका व पाचोरा नगरपालिका या कार्यक्षेत्रातील व आडावद ता. चोपडा येथील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुजप्त्या मद्य विक्रीकरीता बंद राहतील.

अनुक्रमांक 1 मध्ये नमूद क्षेत्राव्यतिरिक्त जिल्ह्यातील “इतर नगरपरिषद हद्दीमधील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने वगळून तसेच कंटेनमेंट झोन मधील मद्य विक्री दुकाने वगळून इतर एफएल-2 / सीएलाएफलटीओडी-3 अनुज्ञप्ती (वाईन शॉप), एफएलबीआर-2 (बीअर शॉपी), व सीएल-3 अनुज्ञप्त्या (देशी दारु किरकोळ विक्री दुकाने) सकाळी 10.00 वाजेपासून सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

3. जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील सर्व घाऊक नमुना एफएल-1 व सीएल-2 अनुज्ञप्त्या सकाळी 10.00 वाजेपासून सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुरु राहतील,

उपरोक्त सुरु ठेवण्यात आलेल्या मदय विक्री अनुज्ञप्त्यांमधून मद्याची विक्री करतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने विहित केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अनुज्ञप्तीधारकाची राहील.

मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा. 2005 च्या कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल होण्यास पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र दारुबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील. सदर आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती तात्काळ रह करण्यात येईल.

(डॉ. अविनाश ढाकणे) भा.प्र.से.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.