Saturday, December 3, 2022

पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

- Advertisement -

पुणे : राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा कहर सुरु आहे. दरम्यान, आज गुरुवारी (८ ऑगस्ट) पुण्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यंमध्येही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाले आहे. मोसमी पावसाची आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा सर्वसामान्य स्थितीत आहे. सध्या कमी दाबाचे क्षेत्र ओडिसाकडे सरकते आहे. परिणामी राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहर आणि परिसरामध्ये आठवडय़ात जोरदार पाऊस झाला आहे. शुक्रवारीही (९ ऑगस्ट) शहराच चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चार दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १ जूनपासून शहरात ७३० मि. मी. पाऊस झाला असून, तो गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या