पुण्यातील रस्त्यांवर वाहने चालविण्यास मनाई

0

पुणे : शहरात अत्यावश्‍यक सेवांशिवाय बाहेर पडणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहेत. ही बंदी 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांनी दुपारी चार वाजता हे आदेश लागू केले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मुंबई आणि पुणे येथील पोलिस आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगने चर्चा केली. त्यानंतर जे योग्य वाटेल ते निर्णय घेण्याची मुभा त्यांनी दिली. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पब्लिक कर्फ्यूची मुदत संपल्यानंतरव पोलिसांनी पहाटेपर्यंत संचारबंदी जारी केली होती.

सोमवारी सकाळी मात्र वाहन चालक मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी कोरोनाची साथ पसरू नये म्हणून वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घातली. मात्र हे आदेश देण्याआधीच पोलिसांनी दुपारी दोन पासून रस्ते अडवण्यास सुरवात केली. त्यांनी वाहनचालकांना कोठे जात आहात हे विचारण्यास सुरवात केली. अत्यावश्‍यक कामांशिवाय बाहेर पडल्यास त्यांना अडवण्यास आणि घरी पाठवण्यास सुरवात केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.