भडगाव- प्रतिनिधी
दि.३ जुन २०१८ रविवार रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीेच्या निमित्ताने जळगाव नगरीत धनगर समाज महासंघ , मल्हार सेना , कर्मचारी संघटना व अहिल्या महिला संघाच्या वतीने भव्य मोटारसायकलची रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन रॅलीत १०० महिला व २०० पुरुष व युवक सभागी झाले होते. महिलानी पारंपारीक वेशभुषेत पिवळ्या रंगाचे फेटा बांधले होते रॅली गोलाणी मार्केट, चित्रा चौक,टावर चौक , नेहरु चौक, नविन बसस्थानक , स्वातंत्र्य चौकमार्गे काढुन रॅलीचा समारोप अल्पबचत भवन येथे करण्यात आला
त्या नंतर अल्पबचत भवन सभागृह जळगाव येथे सामाजिक मेळावा घेण्यात आला.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अहिल्या महिला संघाच्या माजी प्रदेशाध्यक्ष डाॅ. अलकाताई गोडे (बुलढाणा) या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. सुनिलजी पाटील सर हे होते . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन म.रा.अहिल्या महिल्या संघांच्या प्रदेशाध्यक्ष सौ. पुष्पाताई गुलवाडे ( अमरावती ) , श्री. केशवजी पातोंड पोलीस उपविभागिय अधिकारी पाचोरा , श्री. सुभाषभाऊ सोनवणे प्रदेश महासचिव धनगर समाज महासंघ , श्री.संतोष धनगर प्रदेश उपाध्यक्ष धनगर समाज महासंघ , श्री. सुरेशभाऊ धनके माजी शिक्षण व आरोग्य सभापती जि.प. जळगाव , श्री.अमित देशमुख जि.प.सदस्य पहुर, सौ.संगिताताई चिंचोरे पं.स. सदस्य , श्री.नागेशजी हडपे , मल्हार सेना प्रदेश उपध्यक्ष श्री.संदिप तेले ,मल्हार सेना जिल्हाध्यक्ष श्री.संदिपभाऊ मनोरे, श्री दिलीपआण्णा धनगर , सौ. रेखाताई न्हाळदे , महिला जिल्हाध्यक्षा सौ. मंजुषाताई सुर्यवंशी , श्री सुभाष करे , श्री.महेंद्र सोनवणे ,श्री.विष्णुआप्पा ठाकरे , श्री.गणेश जाणे , श्री.हिलालभाऊ सोनवणे , श्री.भरतभाऊ यवस्कर , श्री.रघुनाथ आप्पा सोनवणे ,श्री.प्रभाकर न्हाळदे , श्री.हरिभाऊ हिवराळे , डॉ संजय पाटील इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात प्राचार्य श्री.सुनिल पाटील सर यांचे व्याख्यान झाले यात त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच अहिल्यादेवींच्या बालपणापासुन ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत जीवनप्रवास उलगडला..
या वेळी जिल्ह्यातुन हजारो धनगर समाज बांधव या सामाजिक मेळाव्याला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ.वसुंधराताई लांडगे यांनी केले. आभार धनगर सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेकरिता श्री गणेश बागुल सर, डिगंबर सोनवणे , आकाश कंखरे , निलेश धनगर, शाम मुसांळे (भडगाव) ,प्रविण धनगर , सुनिल खोमणे, विजय पवार सर , निलेश चर्हाटे , राजु धनगर , निलेश चिचोरे (म्हसावद) यांनी परिश्रम घेतले.