भुसावळ :- मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टयांमधील प्रवाश्याची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे-लखनौ दरम्यान काही विशेष साप्ताहिक गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे ते लखनऊ विशेष गाड़ी (1 फेरी) क्रमांक 01445 डाउन साप्ताहिक विशेष पुणे येथून सोमवार दि ३ जून रोजी सकाळी १२.१० वाजता निघणार असून ही गाडी मंगळवार रोजी दुपारी ५.१० वाजता लखनऊ येथे पोहचणार आहे.
तर परतीच्या वेळीस लखनऊ ते पुणे विशेष गाड़ी क्रमांक 01446 अप साप्ताहिक विशेष लखनऊ येथून मंगळवार दि ४ जून रोजी रात्री ८.५५ वाजेला निघणार असून ही गाडी गुरुवार रोजी रात्री २.४५ वाजता पुणे येथे पोहचणार आहे.
दरम्यान या गाडीला लोनावाडा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, बिना, झाँसी, कानपूर या स्थानकांवर थांबा घेणार आहे. प्रवाश्यानी या सुविधेंचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.