पुणे येथे ऊस तोडणी मजुर घेवुन जाणाऱ्या आयशरला अपघात ; पाचोरा येथील दोघांचा मृत्यू

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पुणे येथे ऊस तोडणी मजुर घेवुन जाणाऱ्या आयशरला समोरून विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टॅंकर जोरदार धडक दिली. यात पाचोरा येथील दोन इसमांचा मृत्यु झाल्याची घटना घडली. या भिषण अपघातात पाचोरा येथील निष्पाप इसमांचा टॅंकर चालकाच्या बेसावधानपणाने जीव गेला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील भडगांव रोडवरील ह.मु. कालिका नगर व मुळचे अंतुर्ली ता. पाचोरा येथील रहिवाशी अरुण नारायण पाटील (देसले) वय – ५२ हे त्यांचे मालकीचे आयशर वाहन (क्रंमाक – एम. एच. ४३ – यु – ४४४३) घेवुन येथीलच अरुण भिला बोरसे वय – ६० यांचे सोबत पुणे येथे ऊस तोडणी मजुर घेवुन जात असतांना दि. २७ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास रोहिणी गावा नजिक न्यायडोंगरी कडुन चाळीसगावकडे भरधाव वेगाने व विरुद्ध दिशेने टॅंकरने आयशरला समोरून जोरदार धडक दिली. यात वाहन चालक तथा मालक अरुण नारायण पाटील (देसले) व त्यांचे सहकारी अरुण बोरसे यांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. टॅंकर चालकाच्या हलगर्जीपणामुळे दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

टॅंकर चालकास किरकोड दुखापत झाली असुन त्याचेवर चाळीसगाव येथे उपचार सुरू आहेत. घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात मयत झालेले अरुण नारायण पाटील यांचे पाश्र्चात्य पत्नी, एक मुलगा, दोन मुली तर अरुण बोरसे यांचे पाश्र्चात्य एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.