Thursday, September 29, 2022

पुणे ; गुन्हेगारासोबत लग्न केल्याचा राग, भावाकडूनच बहिणीची हत्या

- Advertisement -

पुणे :

- Advertisement -

गुन्हेगारासोबत प्रेम विवाह करणाऱ्या चुलत बहिणीचा खून भावाने केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ऋतुजा विकी वाघ असे मृत तरुणीचे नाव आहे.  संतोष रोहिदास भोंडवे असे आरोपीचे नाव आहे. ऋतुजाने गुन्हेगारासोबत काही दिवसांपूर्वी प्रेम विवाह केला होता.

- Advertisement -

- Advertisement -

यामुळे आई, आजी आणि कुटूंबाची नाहक बदनामी झाल्याचा राग चुलत भाऊ संतोषच्या मनात होता. आज दुपारी साडेचारच्या सुमारास ऋतुजा आईकडे आली होती. तेव्हा, आई आणि आजीसोबत शाब्दिक बाचाबाची होऊन किरकोळ भांडण झाले. तू गुन्हेगारासोबत प्रेम विवाह केल्याने आमची बदनामी झालेली आहे तू इकडे येऊ नकोस अस म्हटल्यानंतर ऋतुजाने आईला मारहाण केली.

शेजारी राहणाऱ्या संतोषच्या मनात बहिणीने गुन्हेगारासोबत केलेल्या प्रेमविवाहबद्दल चीड होती. त्याने घरात येऊन चुलत बहीण ऋतुजाचा गळा दाबून खून केला. या प्रकरणी संतोषला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋतुजा हिने काही दिवसांपूर्वी गुन्हेगारासोबत मंदिरात जाऊन प्रेम विवाह केला होता. ही बाब घरच्या व्यक्तींना माहीत नव्हती. जेव्हा कळली तेव्हा वेळ निघून गेलेली होती. त्यामुळे घरातील आई, आजी आणि नातेवाईक नाराज होते. ऋतुजामुळे समाजात नाहक बदनामी झाल्याचे घरातील व्यक्तींना जाणवत होत. सर्वाना याचा त्रास होत होता.

प्रेम विवाह झाल्यानंतर ऋतुजा माहेरी दळवी नगर येथे यायची. आई आणि आजी तू इथे येत जाऊ नकोस असे ठणकावून सांगायचे. परंतु ती ऐकायच्या मनस्थिती नसायची. यामुळे अनेकदा वाद होऊन ऋतुजाने आईला मारहाण केली होती. ऋतुजा मोठ्या व्यक्तींचा सन्मान करत नव्हती. आज शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ऋतुजा माहेरी आली. हे आई आणि आजीला आवडल नव्हतं त्यांच्यात शाब्दिक वाद झाला तू इथे येत जाऊ नकोस तुझा गुन्हेगारासोबत प्रेम विवाह झालेला आहे तू तिकडेच राहात जा असं म्हणताच तिने आईला मारहाण केली. शेजारीच राहणाऱ्या पुतण्याला ऋतुजाच्या आईने आवाज दिला. अगोदरच गुन्हेगारासोबत प्रेमविवाह केल्याने आहे ती अब्रू मान सन्मान गेल्याचा राग संतोषच्या मनात होता. त्यानं थेट ऋतुजाचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी संतोषला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या