राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धा : अंतिम सामना पाऊस व थरार
जळगाव | प्रतिनिधी
जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय आंतर जिल्हा महिला खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेचा सोमवारी पुणे विरुद्ध बुलढाणा अंतिम सामना होऊन त्यात टायब्रेकरवर पुणे संघाने तीन एक ने विजय मिळवुन 2019 चा चॅम्पियन शिप वर आपले नाव कोरले
विजयी- उपविजयी संघातील खेळाडू यांना मनपा आयुक्त डॉक्टर उदय टेकाळे ,जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, विफा चे खजिनदार प्यारेलाल चौधरी, पुण्याचे सचिव प्रदीप परदेशी, बुलढाणा चे सचिव एन आर वानखेडे ,जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख, उपाध्यक्ष अस्मिता पाटील, तसेच स्पर्धेचे प्रायोजक नंदलाल गादिया, अमीर शेख, अंजलीताई बाविस्कर, जफर शेख यांच्या हस्ते अनेक प्रकारचे वैयक्तिक पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
अंतिम सामना पाऊस व थरार
नियोजित वेळेप्रमाणे शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सकाळी आठ पंचेचाळीस वाजता अंतिम सामन्यास सुरुवात झाली बुलढाणा संघाने नाणेफेक जिंकून क्रीडांगण ताब्यात घेतले एकूण 80 मिनिटांचा अंतिम सामना खेळवला गेला त्यात दोघी संघांनी पाऊस सुरू असताना सुद्धा आपले कौशल्य पणाला लावून स्पर्धेत थरार निर्माण केला दोघी संघ प्रथमता अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने चॅम्पियन साठी अत्यंत अत्यंत सडो की मरो प्रमाणे खेळत होते अंतिम वेळ सं
संपे पर्यंत कोणताही संघ गोल करू न शकल्यामुळे टायब्रेकरवर हा सामना 3-1 ने पुणे संघाने जिंकला अर्थातच पुण्याची गोलकीपर अंजली बारके हीचा जिंकण्या मध्ये मोलाचा वाटा होता. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा मान बुलढाण्याची दिपक हिवाळे हिने पटकावला
विजयी व उपविजयी संघातील खेळाडूंना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली त्यात सुवर्ण व रजत पदक, प्रत्येक खेळाडूला एक ट्रॅक सूट व संघाला एक ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले
कर्णधार यांचे मनोगत
बुलढाणा संघाची कर्णधार प्रीत हिने आयोजन व नियोजन तसेच भोजन व राहण्याची उत्कृष्ट सोय जळगाव जिल्हा संघटनेतर्फे करण्यात आल्याचे तिने कौतुक केले तर पुण्याची अंजली बारके हिने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट बक्षिसे