पुढारपण सोडा आणि घरीच बसा, नगराध्यक्ष करण पवार

0

पारोळा | प्रतिनिधी

पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करण पवार यांनी शहरातील नागरिकांना पत्रकाद्वारे जाहीर आव्हान केले आहे की कृपया पुढारपण सोडा आणि घरीच बसा, आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हे आवाहन तरूणांना आवर्जून केले आहे,

आज जिकडे तिकडे कोरोना वायरस कोव्हीड १९ चे चित्र भयावह रूप धारण करित असुन अनेक सामाजिक संस्था व  राजकीय पक्ष राजकीय पुढारी तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा

रोजच आपल्या देशातील नागरिकांना अनेक माध्यमातून आवाहन करित अाहेत कि या संसर्गजन्य रोगातुन वाचण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे च आप आपल्या घरी थांबने आपण जर घरी थांबलो तरच या कोरोना वायरस ला हरवू शकतो अन्यथा आपल्या कडे दुसरा कोणताही इलाज आपल्या कडे नाही, याच पार्श्वभूमीवर पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करण पवार यांनी पत्रक छापून ते आपल्या सोशल साइट वर टाकले असुन या पत्रकात असे म्हटले आहे अजुन ही वेळ गेलेली नाही पारोळेकरांनो घरात बसा महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर निघा खास करून तररूणानो, निदान स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी घरात च बसा ही आग्रहाची विनंती, करण बाळासाहेब पवार,असे पत्रक काढले आहे, किमान या पत्रकातुन तरी जण जागृती निर्माण होईल व हा जिव घेणा वायरस आपल्या शहरात प्रवेश करणार नाही याची खबरदारी आपल्या शहरातील नागरिक घेतील तसेच नगराध्यक्ष करण पवार यांच्या ही नवयुवका मध्ये मोठा प्रभाव असुन त्यांनी केलेल्या आवाहन ला पारोळा शहरातील नागरिकांसह नवयुवका मध्ये जागृती होऊन फरक पडेल, तसेच दैनिक लोकशाही च्या वतीने ही संपूर्ण देशातील देशवासियांना आवाहन करण्यात येत आहे की जिवन अमुल्य आहे हे वेळोवेळी मिळत नाही आपल्या जिवनाचे मुल्य ओळखा व आपल्या प्रियजनांनचे रक्षण करा

“कृपया घरा बाहेर पडू नका आपले जीवन व्यर्थ गमवू नका”

Leave A Reply

Your email address will not be published.