पुढच्या 14 दिवसांपैकी 6 दिवस बँका राहणार बंद !

0

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर देशातील विविध बँका सहा दिवस बंद राहणार आहे. ऑक्टोबर महिना संपायला आता फक्त 14 दिवस उरले आहेत. या 14 दिवसांपैकी सहा दिवस बँकेचं कामकाज होणार नाही. ऐनवेळी खोळंबा टाळण्यासाठी बँकिंगशी संबधित कामे वेळीच आटोपून घेण्यासाठी सर्वसामान्यांना धावपळ करावी लागणार आहे

31 ऑक्टोबरपूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी देशातील अनेक बँका बंद राहातील. न्यू एजन्सी पीटीआयनुसार, 10 बँकांच्या विलिनीकरणाविरोधात 22 ऑक्टोबरला बँक संघटनेने संप पुकारला आहे.

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि भारतीय रिझर्व्ह बँक कर्मचारी परिसंघाच्या या संपाला आता ट्रेड युनिअन काँग्रेस (एटक) ने ही समर्थन दिलं आहे. जर हा संप झाला तर 22 ऑक्टोबरला बँका बंद राहातील.

काही दिवसांपूर्वी सरकारने 10 बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली होती. या विलिनीकरणानंतर 4 नव्या बँक अस्तित्वात येतील. तर आंध्र बँक, इलाहबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या अस्तित्वात राहणार नाही.

22 ऑक्टोबरपूर्वी 20 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. तर 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. म्हणजेच दिवाळीपूर्वी (27 ऑक्टोबर) तीन दिवस बँका बंद राहातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला दिवाळी आणि रविवार असल्याने बँकेचं कामकाज बंद राहील.

दिवाळीनंतर 28 ऑक्टोबरला गोवर्धन पुजा आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये बँका बंद असतील. तसेच, 29 ऑक्टोबरला भाऊबीज असल्याने बँकांचं काम बंद राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.