Friday, August 12, 2022

पी. चिदंबरम यांना ‘सुप्रीम’ झटका; जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली – आयएनएक्‍स मीडिया प्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. पी. चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालायने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले कि, प्राथमिक स्तरावर अटकपूर्व जामीन देणे तपासात अडथळा आणू शकते. अटकपूर्व जामीन देण्यास मान्यता देण्यासाठी हे योग्य प्रकरण नाही. आर्थिक गुन्हे गंभीर असून त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज आहे, असे सांगितले आहे.दरम्यान, आयएनएक्‍स मीडिया प्रकरणातील गैरव्यवहाराच्या आरोपाखाली सध्या चिदंबरम केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात आहेत. पी. चिदंबरम यांच्यावर ईडी प्रकरणात देखील अटकेची टांगती तलवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या