पी.चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी !

0

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्‍स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी चार दिवसांची सीबीआय कोठडी दिली. याआधी फेटाळल्या गेलेल्या अटकपूर्व जामीनप्रकरणी चिदंबरम यांनी केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

आयएनएक्‍स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यावर चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या याचिकेची सुनावणी बुधवारीच व्हावी, हा त्यांचा प्रयत्न होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी शुक्रवारी होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज त्यांच्या याचिकेची सुनावणी न्या. आर. भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील पीठात होण्याची शक्‍यता आहे. दिल्ली विशेष न्यायालयाचे अजय कुमार कुहार यांनी प्रथम चिदंबरम यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. तसेच सीबीआय कोठडीत असताना त्यांचे कुटुंबीय आणि वकील यांना त्यांची भेटघेता येईल, असेही स्पष्ट केले. समोर आलेले पुरावे आणि परिस्थिती लक्षात घेता त्यांना कोठडी देणे योग्य आहे, असे न्यायमूर्तीनी नमूद केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.