पी.आर.हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी अॅड. दिलीप बोरसे व सौ. उज्ज्वलाताई म्हाळके यांचा सत्कार

0
धरणगाव (प्रतिनिधी) :
येथील पी. आर. हायस्कूलमध्ये शाळेचे माजी विद्यार्थी अॅड. दिलीप बोरसे आणि सौ. उज्ज्वला म्हाळके यांचा विशेष निवडीबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी होते.
                         सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी यांनी प्रास्ताविकातून शाळेचे माजी विद्यार्थी जेव्हा यशाचं शिखर गाठतात तेव्हा तो त्या शाळेचा सन्मान असतो असे नमूद केले. या प्रसंगी पी.आर.हायस्कूलचे माजी विद्यार्थी अॅड. दिलिप बोरसे यांची जिल्हा वकिल संघावर अध्यपदी निवड झाली म्हणून डॉ. अरुण कुलकर्णी व संचालक अजयभाऊ पगारिया यांचे हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तर जि. प. च्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सौ. उज्वलाताई म्हाळके यांचा डॉ. मिलिंद डहाळे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून जाहिर सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींचे स्वागत उपमुख्याध्यापक एस.एम.अमृतकार व पर्यवेक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले. या प्रसंगी प्रशांत म्हाळके, नगरसेवक शरद धनगर, उमाकांत बोरसे, जितेंद्र बोरसे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा संयोजक नवनीत सपकाळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. आर. बन्सी, डी. एस. पाटील, एन. वाय. शिंदे, डी. के. चौधरी, सुरेश ओस्तवाल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परीश्रम घेतले.
Leave A Reply

Your email address will not be published.