जळगाव प्रतिनिधी
आपली जळगाव पीपल्स बँक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपणास नवनवीन सेवा सुविधा देण्यात नेहमीच अग्रेसर राहीली आहे. काळानरूप तंत्रज्ञानातील बदल व बँकींग क्षेत्रात वाढत जाणार्या तंत्रज्ञान आधारीत सेवा सुविधा लक्षात घेउन संचालक मंडळाने इन्फोसिस या नामांकीत कंपनीव्दारा निर्मित फिनॅकल ही कोअर बँकींग प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय जानेवारी 2018 मध्ये घेतला. सदर कार्यप्रणाली कॉसमॉस इ-सोल्युशन्स पुणे या संस्थेमार्फत कार्यान्वित करण्याचा करार करण्यात आला. बँकेच्या 15 अधिकारी यांना सदर प्रणालीचे प्रशिक्षण हे इन्फोसिस कंपनीच्या म्हैसुर व बंगलोर येथील प्रशिक्षण सेंटर येथे देण्यात आले.
त्यानंतर बँकेचे संचालक मंडळाने बँकेचे प्रबंध संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली, फिनॅकल इम्प्लीमेंटेशन विभाग सुरु करण्यात आला. सदर टीममध्ये बँकेचे वरीष्ठ अधिकारी तसेच बँकेच्या विविध स्तरावर म्हणजेच कार्यालयीन व शाखानिहाय स्तरावर काम केलेलेे अनुभवी व तज्ञ अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले गेले. तसेच वेळोवेळी बँकेचे सर्व कर्मचारी यांना फिनॅकल प्रणाली वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते.