पीआरएस काउंटर तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकी वरून त्याचा परतावा मिळवण्यासाठीच्या कालमर्यादेत वाढ

0

भुसावळ (प्रतिनिधी)– रेल्वे मंत्रालयाकडून 21.03.2020 ते 31.07.2020 या कालावधी साठी तील प्रवासाची आरक्षित केलेली पीआरएस काउंटर तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकी वरून त्याचा परतावा मिळवण्यासाठीच्या कालमर्यादेत वाढ

रेल्वेच्या नियमित वेळापत्रकातील रेल्वेने रद्द केलेल्या गाड्यांसंदर्भातच हे लागू आहे

रेल्वे मंत्रालयाने प्रवासाच्या 21.03.2020 ते 31.07.2020 या कालावधीसाठी आरक्षित केलेली पीआरएस काउंटर तिकिटे रद्द करण्यासाठी व आरक्षण खिडकीवरून त्याचा परतावा मिळवण्यासाठी घातलेली कालमर्यादा प्रवासाच्या दिवसांपासून सहा महिने होती ती आता वाढवून नऊ महिन्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. जर आरक्षित तिकीट 139 मधून वा आयआरसीटीसी संकेतस्थळावरून रद्द केले गेले असेल तर असे तिकीट प्रवासाच्या दिनांका पासून नऊ महिन्यात आरक्षण खिडकीवर परत करता येईल.

प्रवासाच्या दिवसापासून सहा महिने उलटून गेल्यामुळे, अनेक प्रवाश्यांनी आपली मूळ तिकिटे विभागीय रेल्वेच्या दावा कार्यालयात TDR किंवा साध्या अर्जासहित जमा केली असतील, प्रवाश्यांना अश्या पीआरएस काउंटर तिकीटांचा परतावा देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

याआधी, कोविड-19 परिस्थितीत तिकीटे रद्द करणे तसेच त्यांचा परतावा देणे याबाबत सविस्तर मार्गदर्शक नियमावली जारी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.