चोपडा : तालुक्यातील चहार्डी वेले रस्त्यावरील साखर कारखान्याच्या गेटजवळ शेळ्या-मेंढ्यांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना अज्ञात चार दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडील चार ते पाच लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेत दरोडेखोरांकडून लुटली जाणारी रोकड शेजारील शेतातील शेतकरी व गावकरी धावून आल्याने वाचली असली तरी दहा ते वीस हजार रुपये हिसकावून नेण्यात ते यशस्वी झाले. ही घटना ५ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर असे की, व्यापारी दिलीप काशीनाथ धनगर (रा. चहार्डी) आणि कलीम सलील खाटिक (रा. हातेड बु) हे हैदराबाद येथे शेळ्यामेंढ्या विकून परत चहार्डी येथे परत येत असताना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कारखान्याच्या गेट शेजारी रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड पाटाच्या चारी शेजारी आडवे करून वाहन अडवले. शेळ्या व मेंढ्या विकून त्यांनी सोबत जवळपास चार लाख रुपयांची रोकड आणली होती. गाडीत पुढे बसलेल दिलीप धनगर व कलीम खाटीक यांना दुचाकीवरून आलेल्या अंदाजे चार ते पाच दरोडेखोरांनी धनगर व खाटिक यांच्या डोक्याला पिस्तुल लावून धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र घटना स्थळापासून वेल्याकडे वाहन चालक संतोष जाधव याने काही अंतरापर्यंत पळत जाऊन शेतकरी विनोद पाटील आणि लीलाधर पाटील यांना सदर घटना सांगितली. शेतकरी व चालक परत घटना आल्याने व तोपर्यंत व्यापारी आणि दरोडेखोर यांच्यात झटापट सुरूच होती. त्यात दरोडेखोरांनी व्यापाºयांना व त्यांच्यासोबत असलेला छोटू बापू धनगर यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघेही व्यापाºयांना मुक्कामार लागला असून ते चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान या सर्व घडामोडीत सुमारे चार लाखाची रोकड वाचली मात्र दिलीप धनगर यांच्या खिशातील वीस हजार रुपये दरोडेखोरांनी लुटून नेले. यावेळी लुटारूंची गावठी पिस्तुल घटणास्थळा वरच पडली होती.
दरम्यान या प्रकरणी चोपडा साखर कारखान्याच्या गेटच्या मागच्या बाजूला फेकलेला गावठी कट्टा पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.